
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
युवा लहुजी संघर्ष सेनेचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम
पुणे (भाम्बुर्डा) — मातंग समाजाच्या समृद्ध इतिहास, संघर्ष आणि योगदानाचा सविस्तर वेध घेणारे ‘मातंग समाजाचा इतिहास’ हे पुस्तक युवा लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने माननीय आदित्यजी ठाकरे यांना सप्रेम भेट देण्यात आले. यापूर्वी माननीय आदित्यजी ठाकरे यांच्याशी या विषयावर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली होती. त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक डॉ. सुहास नाईक लिखित या महत्त्वपूर्ण ग्रंथाला माननीय आदित्यजी ठाकरे यांनी मनापासून पाठिंबा दर्शविला.
या प्रसंगी युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय लक्ष्मण तात्या तांदळे, नगरसेवक काकासाहेब चव्हाण, लोकनियुक्त सरपंच गोकुळ करंजवणे, सरपंच संदीप मते, आमदार सचिन आहेर साहेब, नगरसेवक सचिन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

माननीय आदित्यजी ठाकरे यांनी पुस्तकाचे कौतुक करताना, “मातंग समाजाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. अशा ग्रंथांमुळे सामाजिक जाणीव वाढते आणि समतेचा विचार बळकट होतो,” असे उद्गार काढले. युवा लहुजी संघर्ष सेनेने समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व प्रसार करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमातून मातंग समाजाच्या इतिहासाला व्यापक व्यासपीठ मिळाले असून, सामाजिक समरसतेच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

