
माजी उपनगराध्यक्ष रमेश चांदणे (आप्पा) यांची नगरसेवकपदी दणदणीत निवड
शाहुवाडी प्रतिनिधी:पांडुरंग फिरींगे
मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते, मलकापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री. रमेश चांदणे (आप्पा) यांची मलकापूर नगरपालिकेवर नगरसेवकपदी दणदणीत निवड झाल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चांदणे (आप्पा) हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याची पावती म्हणून नागरिकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. ही निवड म्हणजे मातंग समाजाच्या राजकीय सबलीकरणाचा ठोस पुरावा असल्याची भावना समाजबांधवांतून व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल शाहूवाडी–पन्हाळा तालुका मातंग समाज, युवा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण (तात्या) तांदळे तसेच पुणे शहर व जिल्हा मातंग समाजाच्या वतीने माननीय रमेश चांदणे (आप्पा) यांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.
निवडीनंतर समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून,
“करल काय नाद परत…!”
अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
ही निवड येणाऱ्या काळात समाजहिताचे, विकासाभिमुख निर्णय घेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास समाजातील विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

