
कोतोली प्रतिनिधी- पांडुरंग फिरींगे
भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते व संवेदनशील कवी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील ज्युनिअर सायन्स विभागामार्फत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अटलजींच्या राष्ट्रनिष्ठ नेतृत्वाने, लोकशाही मूल्यांवरील निष्ठेने व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनाने देशाला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करावी, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. उत्तम पवार, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. शरदचंद्रिका लिगाडे, प्रा. सुजाता पाटील, प्रा. सुधीर पाटील उपस्थित होते. सर्वांनी अटलजींच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. प्रकाश लव्हटे यांनी केले. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील देशहिताचे निर्णय, साहित्यिक योगदान व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. स्मिता कुंभार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, मूल्याधिष्ठित राजकारण व समाजभान रुजवण्याचा संदेश देण्यात आला.
फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना श्री. विजय पाटील. समवेत प्रा. उत्तम पवार, प्रा. प्रकाश लव्हटे, प्रा. सुधीर पाटील, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. स्मिता कुंभार, प्रा. सुजाता पाटील, प्रा. शरदचंद्रिका लिगाडे व मान्यवर.

