
पांडुरंग फिरींगे
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण पोलीस खात्यावर शोककळा पसरवणारी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व संवेदनशील पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस विभागासह सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व युवक वर्ग हळहळ व्यक्त करीत आहे.
पोलीस खात्यामध्ये उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवित असताना पीएसआय मोहन सोनकुसरे यांनी केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकासाठी आपुलकीने काम केले. कोणत्याही समाजाचे आंदोलन, उपोषण किंवा सामाजिक प्रश्न असो—त्यावर संवाद, समन्वय आणि न्यायाची भूमिका घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच ते केवळ अधिकारी न राहता जनतेतील एक माणूस म्हणून ओळखले जात होते.
युवा लहुजी संघर्षनेच्या वतीने पीएसआय मोहन सोनकुसरे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, “समाजासाठी झटणारे, अन्यायाविरोधात ठाम उभे राहणारे हे नेतृत्व अकाली हरपले,” अशा शब्दांत शोक व्यक्त करण्यात आला आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.
— भावपूर्ण श्रद्धांजली

