कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच संगीतमय मेजवानी ; ‘ब्रास, स्ट्रिंग, रिदम आणि व्हॉइस’ या भव्य मैफिलीचे आयोजन

0
16

प्रतिनिधी : जानवी घोगळे
नववर्ष २०२६ ची सुरुवात अविस्मरणीय आणि संगीतमय ठरणार असून, कोल्हापूरकरांसाठी एक खास संगीतपर्वणी सज्ज झाली आहे. अवघ्या सात दिवसांत, येत्या *१० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता, *आनंदभवन ऑडिटोरियम, सायबर कॅम्पस, कोल्हापूर येथे “ब्रास, स्ट्रिंग, रिदम आणि व्हॉइस” या भव्य संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मैफिलीचे मुख्य आकर्षण म्हणजे बॉलिवूडमध्ये ‘भारताचा ट्रम्पेट किंग’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार किशोर सोढा यांचा पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये होणारा लाइव्ह परफॉर्मन्स. भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीताच्या इतिहासात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे किशोर सोढा यांनी पाच दशकांहून अधिक काळ आपल्या ट्रम्पेटच्या सुरांनी रसिकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या संगीताने असंख्य गाजलेल्या हिंदी चित्रपटांना वेगळी उंची मिळवून दिली आहे.

त्यांच्यासोबतच बॉलिवूडमधील तालवादनाचे जादूगार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्कशनिस्ट श्याम एडवणकर आपल्या रिदमची जादू दाखवणार आहेत. त्यांच्या तालसाधनेने देश-विदेशातील अनेक मंच गाजवले असून, कोल्हापूरकरांना त्यांचा थेट अनुभव घेण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे.

या भव्य मैफिलीत

  • ७ अव्वल गायक,
  • १६ प्रतिभावान वादक,
  • आणि सेलेब्रेटी निवेदक संदीप पाटील
    हे सर्व एकत्र येऊन प्रेक्षकांना एक अनोखा संगीतमय अनुभव देणार आहेत. भव्य सेटअप, उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रासह ही मैफिल रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

ब्रास, स्ट्रिंग, रिदम आणि व्हॉइस यांचा सुरेल संगम असलेली ही मैफिल केवळ ऐकण्याचीच नव्हे तर अनुभवण्याची संधी देणारी आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच अशा दर्जेदार आणि भव्य संगीत कार्यक्रमाची मेजवानी कोल्हापूरमध्ये होत असल्याने संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

या कार्यक्रमासाठी इन-ॲडव्हान्स तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात झाली असून, प्रेक्षकांनी आपली निराशा टाळण्यासाठी लवकरात लवकर तिकीट बुक करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

नववर्षात संगीताच्या सुरांनी मन प्रसन्न करणारी, अविस्मरणीय अशी ही मैफिल कोल्हापूरकरांनी आवर्जून अनुभवावी, असे मत संगीत रसिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here