
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
येथील विवेकानंद कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभागप्रमुख डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी केले. यावेळी प्रा. अनिल जांभळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्री शिक्षणासाठी केलेल्या क्रांतिकारक कार्याचा सविस्तर परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागातील प्राध्यापकांनी रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. आभार प्रदर्शन डॉ. अवधूत टिपुगडे यांनी केले.
या कार्यक्रमास ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

