
कोलोली गाडाईदेवी मंदिरात सुरू असलेला ज्ञानेश्वर हरीनाम पारायण सप्ताह.
🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
येथील श्री गाडाईदेवी मंदिर परिसरात ज्ञानेश्वर हरीनाम पारायण सप्ताह सोहळ्याला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. परिसरात टाळ–मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
या पारायण सोहळ्याचे आयोजन रघुनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, यावेळी भाविकांच्या सहभागातून पारायण व दिंडीचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभंग–भजन, हरिपाठ, कीर्तन व नामस्मरणाने वातावरण पूर्णतः भक्तिरसात न्हाऊन निघाले.
पारायण सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामस्थ, महिला, युवक व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, संपूर्ण आठवडा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न होणार आहे. या उपक्रमामुळे गावात भक्ती, एकोप्याची भावना व सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याचे मत उपस्थित भाविकांनी व्यक्त केले.


