कोतोली येथे अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी काढलेल्या बालचमू बाजार उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

0
37

कोतोली प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
ग्रामपंचायत कार्यालयासमोर “भाजी घ्या… गवार, मेथी घ्या…” अशा निरागस आरोळ्या देत अंगणवाडीतील बालचमूने परिसर दणाणून सोडला. या अनोख्या उपक्रमात चिमुकल्यांनी स्वतः पिकवलेली ताजी भाजी विक्रीसाठी मांडली होती.बालकांच्या उत्साही हाकांमुळे पालकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत खरेदीसाठी सहभाग नोंदवला. या उपक्रमातून बालकांना व्यवहारज्ञान, आत्मविश्वास आणि श्रमाचे महत्त्व शिकवण्याचा उद्देश साध्य झाला.अंगणवाडीचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला असून ग्रामस्थांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here