थिनरमुळे लागलेल्या आगीत ऑफिस जळून खाक; चिखलीतील खासगी कंपनीला आग

0
67

कोल्हापूर प्रतिनिधी: प्रियांका शिर्के – पाटिल

पिंपरी : चिखलीतील शेलारवाडीतील खासगी कंपनीला बुधवारी (दि- ६) सकाळी ९ च्या दरम्यान आग लागली. त्यात आगीमध्ये ऑफिसमधील कम्प्युटर, लॅपटॉप, फ्रीज, फॅन, थिनरचे डब्बे इन्वर्टर, फर्निचर तसेच ऑफिसचे काही दस्तावेज जळाले.

अग्निशमनच्या दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणेदहाच्या सुमारास तळवडे येथील अग्निशमन केंद्रास चिखली येथे आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाच्या ४ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली.

या आगीमध्ये ऑफिसमधील कम्प्युटर, लॅपटॉप, फ्रीज, फॅन, थिनरचे डब्बे इन्वर्टर, फर्निचर तसेच ऑफिसचे काही दस्तावेज जळाले.

ऑफिसच्या खाली असलेल्या पेंटबुथमध्ये ग्राइंडिंग मशीनचे काम चालू होते. या ग्राइंडिंग मशीन मधील स्पार्क हे जवळच असलेल्या थिनरच्या डब्यावरती पडले आणि आग लागली. थिनरमुळे आगीने लगेच भडका घेतला.

महापालिकेच्या तळवडे, चिखली, पिंपरी व मोशी या चार अग्निशमन दलातील २२ अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here