क्रिडाई कोल्हापूरच्या ‘दालन 2026’ वास्तू प्रदर्शनाच्या भव्य मंडप उभारणीस सुरुवात;३० जानेवारीपासून महासैनिक दरबार ग्राउंडवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम महोत्सव

0
9

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पांडुरंग फिरींगे
पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूर तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शन ‘दालन 2026’ च्या मंडप उभारणीस आज अधिकृत सुरुवात झाली. येत्या ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महासैनिक दरबार हॉल ग्राउंड, कोल्हापूर येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
रविवार, ११ जानेवारी रोजी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या शुभहस्ते मंडप उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी दालनचे चेअरमन महेश यादव, व्हाइस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शाह, क्रिडाईचे सचिव गणेश सावंत, दालन सचिव संग्राम दळवी तसेच पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रिडाईचा ३५ वर्षांचा भक्कम वारसा
प्रास्ताविकात बोलताना अध्यक्ष के. पी. खोत यांनी क्रिडाई कोल्हापूरच्या ३५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. बांधकाम व्यावसायिकांचे हित जपतानाच शहराच्या सर्वांगीण विकासात क्रिडाईने दिलेल्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
‘दालन’ – तीन दशकांची उज्ज्वल परंपरा
दालनबाबत माहिती देताना चेअरमन महेश यादव यांनी सांगितले की, सन १९९२ मध्ये बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली असून, ‘दालन 2026’ हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे १३ वे प्रदर्शन आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
एकाच छताखाली घराचे स्वप्न साकार
‘दालन 2026’ चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली
नवनवीन बांधकाम प्रकल्प
आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान
दर्जेदार साहित्य
गृहकर्ज व अर्थसहाय्य योजना
यांची सविस्तर माहिती मिळणार आहे.
“संधी सर्वांसाठी” ही यंदाच्या दालनची संकल्पना असून, घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे.
दालन 2026 – प्रायोजक
🔹 प्लॅटिनम स्पॉन्सर
आर्या स्टील्स रोलिंग प्रा. लि.
🔹 डायमंड स्पॉन्सर
इटाका सिरॅमिक्स
एसकॉन इस्पात प्रेस्टिज एल.एल.पी.
🔹 गोल्ड स्पॉन्सर (बिल्डर्स)
केवेस्ट इन्फ्रा अँड हायवेस्ट डेव्हलपर्स
🔹 गोल्ड स्पॉन्सर
अविष्कार इन्फ्रा
मोटो टाईल्स
स्टेट बँक ऑफ इंडिया
यश पॉली
सिम्पोलो टाईल्स
🔹 सिल्वर स्पॉन्सर
विंडो एक्स्पर्ट
एच.आर. विंडटेक (व्ही.ई.के. प्रा. लि.)
तेजस इंडस्ट्रीज
युनियन बँक ऑफ इंडिया
🔹 सेमी कॉर्पोरेट स्पॉन्सर
फेराकॉल
स्मॅश एलिव्हेटर
बँक ऑफ इंडिया
एन.एन. आयटी कार पार्किंग सिस्टीम्स
वोक्स इंटेरियर अँड एक्स्टेरियर सोल्युशन्स
हायड्रा पार्क
ग्रेट व्हाईट ग्लोबल
पॅरीवेअर रोका
लिशा स्विचेस
ओटीस एलिव्हेटर्स
कोने एलिव्हेटर्स
विशेष उपक्रम
🔸 ३१ जानेवारी २०२६ | दुपारी ४.३० वाजता
सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल सेमिनार
🔸 १ फेब्रुवारी २०२६ | दुपारी ४.३० वाजता
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्याशी सुसंवाद
🔸 २ फेब्रुवारी २०२६ | दुपारी ४.३० वाजता
भव्य सांगता समारंभ
कार्यक्रमाचा समारोप सचिव गणेश सावंत यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.
या प्रसंगी क्रिडाई कोल्हापूर व महाराष्ट्रातील पदाधिकारी, विविध समित्यांचे चेअरमन, ज्येष्ठ सभासद, प्रायोजक, स्टॉलधारक व बांधकाम क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here