
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोलोली येथील जय जोतिर्लिंग माध्यमिक विद्यालयाचा रेखाकला (चित्रकला) परीक्षेचा निकाल यंदा शंभर टक्के लागला आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी ३४ तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी १७ असे एकूण ५१ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
यामध्ये ५ विद्यार्थी अ श्रेणीत, १८ विद्यार्थी ब श्रेणीत तर २८ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे कलाशिक्षक टी. एस. पाटील सर, श्री. आय. एस. कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच मुख्याध्यापक श्री. अरुण काळे सर, संस्था अध्यक्ष श्री. जी. डी. पाटील, उपाध्यक्ष श्री. बी. के. जाधव तसेच सर्व संस्था संचालकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

