
मुंबई / कोल्हापूर
(प्रतिनिधी)
जागतिक स्तरावरील,अत्यंत निवडक पत्रकारांची, प्रतिष्ठित पत्रकार संघटना World Press Collective (युनायटेड स्टेट अमेरिका) USA यांनी पत्रकार, लेखक व सामाजिक भान जपणारे माध्यम प्रतिनिधी सुभाष गणपती माने यांची Recognized Member म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. ही निवड केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नसून, त्यांच्या सातत्यपूर्ण, सत्यनिष्ठ व समाजाभिमुख पत्रकारितेवर जागतिक पातळीवर झालेल्या विश्वासाचे द्योतक मानली जात आहे.
World Press Collective (USA) ही आंतरराष्ट्रीय संघटना पत्रकारिता क्षेत्रातील स्वातंत्र्य, नैतिकता, पारदर्शकता आणि पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी कार्यरत आहे. विविध देशांतील पत्रकार, लेखक, संपादक आणि माध्यम कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणून जागतिक पत्रकार नेटवर्क निर्माण करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या संस्थेचे मुख्यालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरात आहे तर या संस्थेचे भारत देशाचे चेअरमन म्हणूनची जबाबदारी इंडियन रिपोर्ट्स असोशिएशनचे राष्ट्रीय महासचिव मोहम्मद जहांगिर (न्यू दिल्ली) हे सांभाळत आहेत.एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपत या संस्थेचे भारतीय सदस्य आहेत.या सदस्यापैकी सुभाष माने यांची ही निवड म्हणजे त्यांच्या कर्तव्य तत्पर प्रामाणिक निष्ठेचे आणि प्रदिर्घ वाटचलीच्या निष्ठेचे हे फळ आहे.
पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर अधिकृत शिक्कामोर्तब
Recognized Member ही सदस्यता अत्यंत निवडक पत्रकारांना देण्यात येते. उमेदवाराचे लेखन, सामाजिक योगदान, पत्रकारितेतील अनुभव आणि नैतिक भूमिका यांचा सखोल अभ्यास करून ही मान्यता दिली जाते. त्यामुळे सुभाष माने यांची निवड ही त्यांच्या पत्रकारितेच्या दर्जावर आणि सामाजिक प्रश्नांबाबतच्या ठाम भूमिकेवर अधिकृत शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.
या नियुक्तीमुळे त्यांची ओळख केवळ स्थानिक किंवा राज्यस्तरापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पत्रकार समुदायामध्ये नोंदवली गेली आहे. ग्रामीण प्रश्न, शिक्षण, सामाजिक न्याय, जनहिताचे विषय यावर सातत्याने लेखन करणाऱ्या सुभाष माने यांना या माध्यमातून जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात लाभदायक ठरणारी सदस्यता
या मान्यतेमुळे सुभाष माने यांना अधिकृत Membership Certificate प्राप्त झाले असून ते पत्रकार म्हणून ओळख पुरावा म्हणून वापरता येणार आहे. शासकीय, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे वृत्तांकन करताना, माहिती संकलन, मुलाखती व प्रेस नोट्सच्या माध्यमातून संवाद साधताना या सदस्यतेमुळे विश्वासार्हता अधिक दृढ होणार आहे.तसेच, आंतरराष्ट्रीय पत्रकार, संपादक व माध्यम संस्थांशी थेट संपर्क, संयुक्त लेखन, विशेष अहवाल, परिषद व वेबिनारमध्ये सहभाग अशा विविध संधी भविष्यात खुल्या होणार आहेत. मानवी हक्क, ग्रामीण विकास, शेतकरी प्रश्न यांसारखे विषय मांडताना आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचा संदर्भ देणे शक्य होणार असल्याने स्थानिक प्रश्नांना जागतिक व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे.
जबाबदारीची जाणीव आवश्यक
ही सदस्यता कोणतेही शासकीय अधिकार किंवा नोकरी देत नसली तरी ती नैतिक बळ, व्यासपीठ आणि पत्रकारितेतील विश्वास प्रदान करते. त्यामुळे या पदाचा वापर सत्य, निःपक्ष व जबाबदार पत्रकारितेसाठी करणे आवश्यक असल्याचेही जाणकारांकडून नमूद करण्यात येत आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
सुभाष गणपती माने यांच्या या आंतरराष्ट्रीय नियुक्तीबद्दल पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व वाचक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या लेखनातून समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज बुलंद होत राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
World Press Collective (USA) मधील ही निवड म्हणजे श्री .माने यांच्या विचारांचा, लेखणीचा आणि सामाजिक बांधिलकीचा जागतिक स्तरावर झालेला सन्मानच आहे.ते संध्या चालवत असलेल्या ‘टाईम्स ऑफ भुदरगड,गारगोटी’ या अंकाचा हा सन्मान आहे.या निवडीमूळे कोल्हापूर जिल्ह्याच्या मिडियाची शान वाढली आहे.
टाईम्स ऑफ भुदरगड,गारगोटी

