
पन्हाळा प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर येथील ज्येष्ठ लेखक, अर्थतज्ज्ञ व प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित ‘अमृतमहोत्सवी भारत’ या ग्रंथाचे प्रकाशन ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या शुभहस्ते पन्हाळा येथे संपन्न झाले.
स्वतंत्र भारताच्या गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडातील आर्थिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीचा सविस्तर आणि अभ्यासपूर्ण आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखा-जोखा मांडणारा हा ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणादायी ठरेल, असे मत विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील होते. त्यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. लेखक डॉ. जे. के. पवार यांनी ग्रंथाची भूमिका व लेखनामागील उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास उनाळे-पवार यांनी केले, तर श्री. बी. ए. पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
यावेळी प्रा. शंकर गायकवाड, प्रा. एस. बी. बरगे, व्ही. जी. पाटील, दत्ता गायकवाड, सतीश कुलकर्णी, क्षमा कुलकर्णी, आशा जाधव-पाटील, नंदिनी रणखांबे, कांचन जोशी, आण्णा नालंग, किरण मोहिते, अजय कदम, ज्योती कदम, श्रीकांत मालंडकर, अरुण ठाणेकर, स्वाती लिमये, शैला जोशी, मीनल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ : ‘अमृतमहोत्सवी भारत’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना पानिपतकार विश्वास पाटील. समवेत (डावीकडून) प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, लेखक डॉ. जे. के. पवार, दत्ता गायकवाड व बी. ए. पाटील.

