
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात पश्चिम पन्हाळा तालुक्यातील पत्रकार तसेच भारतीय सैन्यदलात अग्नीवीर म्हणून निवड झालेल्या युवकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयकुमार पाटील होते.यावेळी बोलताना डॉ. जे. के. पवार यांनी सांगितले की, बदलत्या काळातही पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून टिकून आहे. समाजातील सामान्य लोकांना योग्य माहिती मिळावी यासाठी पत्रकारांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांना थेट लाभ झाला असून, लोकशाही मजबूत होण्यास हातभार लागला आहे.देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांची जितकी आवश्यकता आहे, तितकेच समाजासाठी कार्य करणारे पत्रकारही महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. के. एस. चौगुले यांनी व्यक्त केले. प्रसारमाध्यमांनी विषयांना प्रसिद्धी दिल्यामुळे प्रशासन व कार्यकर्ते अधिक तत्परपणे काम करतात, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमास सचिव शिवाजीराव पाटील, एन. डी. मांगोरे, डॉ. बी. डी. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, डॉ. यु. यु. पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तब्बु कवठेकर यांनी केले.


