स्मार्ट बाजार चा ‘फुल पैसा वसूल सेल ’ २१ जानेवारी पासून सुरू

0
12

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

  • किराणा, वैयक्तिक निगा, घरगुती आणि प्रवासाशी संबंधित उत्पादनांवर खास सवलती
  • देशभरातील ९५० हून अधिक दुकानांमध्ये एकाच वेळी वर्षातील सर्वात मोठी मूल्यप्रधान खरेदी मोहीम

मुंबई, २० जानेवारी २०२६: स्मार्ट बाजारतर्फे २१ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत खास ‘फुल पैसा वसूल सेल ’ आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही विक्री देशभरातील सर्व स्मार्ट बाजार दुकानांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. या कालावधीत दैनंदिन वापराच्या वस्तूं पासून घरगुती व प्रवासासाठी लागणाऱ्या उत्पादनांपर्यंत आकर्षक सवलती देण्यात येणार आहेत . या सेल दरम्यान ग्राहकांना ५ किलो बासमती तांदूळ आणि २.७३ लिटर खाद्यतेल यांचा विशेष संयुक्त पॅक केवळ ₹७४९ या सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. बिस्किटांवर “कोणतीही दोन खरेदी करा आणि कोणतीही एक मोफत मिळवा” अशी योजना असेल. कपडे धुण्याच्या साबणावर किमान ३० टक्के सूट, आंघोळीचे साबण आणि दातमंजनावर किमान ४० टक्के सूट, तर नामांकित शॅम्पूंवर थेट ३५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.

याशिवाय रेमंड, वेल्सपन आणि ट्रायडेंट या ब्रँडच्या चादरींवर “एक खरेदी करा, तीन मोफत मिळवा” अशी योजना, अॅरिस्टोक्रॅट आणि ट्रावर्ल्ड यांच्या तीन नग हार्ड ट्रॉली संचावर थेट ८५ टक्क्यांपर्यंत सूट तसेच एलवायएफ कंपनीचा दोन भांडी असलेला मिक्सर-ग्राइंडर फक्त ₹९९९ मध्ये उपलब्ध होणार आहेर्. फुल पैसा वसूल सेल चा मुख्य उद्देश ग्राहकांना त्यांच्या बजेट वर अतिरिक्त ताण न देता अधिक मूल्य आणि मोठी बचत करून देणे हा आहे. ५३० हून अधिक शहरांमध्ये असलेल्या ९५० पेक्षा जास्त दुकानांच्या माध्यमातून स्मार्ट बाजार देशभरात विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या खरेदीसाठी ओळखला जात आहे. ग्राहकांनी २१ ते २६ जानेवारीदरम्यान आपल्या जवळच्या स्मार्ट बाजार दुकानाला भेट देऊन या विशेष विक्रीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here