कोतोली जि.प. मतदार संघात शिंदे सेनेचा उमेदवारी अर्ज दाखल; वर्षाराणी अरुण पाटील रिंगणात

0
138


कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली जिल्हा परिषद मतदार संघातून शिंदे गटाच्या शिवसेने तर्फे वर्षाराणी अरुण पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृत पणे दाखल केला. मोजक्या पण विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील, संतोष पोवार, अशोक चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. साधेपणात पण ठाम आत्मविश्वासाने दाखल झालेला हा अर्ज कोतोली मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या निवडणुकीत वर्षाराणी अरुण पाटील यांना माजी आमदार सत्यजित पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचा भक्कम पाठिंबा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ही निवडणूक लढवत आहेत. अनुभवी नेतृत्वाचा आधार आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
कोतोली मतदारसंघात विकास, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार वर्षाराणी पाटील यांनी व्यक्त केला असून, आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here