जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठे बळ; घोटवडेचे माजी सरपंच बाजीराव पाटील यांचा जाहीर प्रवेश

0
88

कोतोली- प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मोठे बळ मिळाले असून घोटवडे गावचे माजी उपसरपंच व प्रभावी गटनेते आदरणीय बाजीराव पाटील यांनी आज पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आदरणीय विनयरावजी कोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी आदरणीय विनयरावजी कोरे , श्री. शंकर पाटील, हनुमान उद्योग समुहाचे संचालक युवा नेते प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील श्री. बाजीराव पाटील, श्री. सागर वरपे, श्री. राज लव्हटे, श्री. राम सावंत यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
घोटवडे परिसरात विकासकामे, लोकसंपर्क आणि संघटन कौशल्यासाठी ओळख असलेले बाजीराव पाटील यांच्या प्रवेशामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे. त्यांच्या प्रवेशाने गावपातळीवर पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
याप्रसंगी विनयरावजी कोरे साहेब यांनी बाजीराव पाटील यांचे पक्षात स्वागत करताना, “जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीच जनसुराज्य शक्ती पक्षात गरज आहे. बाजीराव पाटील यांच्या अनुभवाचा पक्षवाढीस निश्चितच लाभ होईल,” असे मत व्यक्त केले.
या जाहीर प्रवेशामुळे घोटवडे व परिसरातील राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला असून, आगामी काळात जनसुराज्य शक्ती पक्ष अधिक ताकदीने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here