
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ‘आपला संग्राम’ सज्ज
कोल्हापूर जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणूक २०२६-३१ अंतर्गत पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघ, गट क्र. ४० मध्ये विकासाचा विश्वासार्ह चेहरा म्हणून पाचगावचे माजी लोकनियुक्त सरपंच मा. श्री. संग्राम गोपाळ पाटील यांचे नाव जनतेतून पुढे आले आहे.
त्यांनी
अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी पाचगावसारख्या मोठ्या गावाची जबाबदारी खांद्यावर घेत दूरदृष्टी, कार्यक्षमता व पारदर्शक कारभारातून त्यांनी विकासाची ठोस दिशा ठरवली. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेली कामे आजही पाचगावच्या विकासाची ओळख ठरली आहेत.
पाचगावसह मोरेवाडी, उजळाईवाडी व तामगाव परिसरात त्यांचा भक्कम जनसंपर्क असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सातत्याने कार्य करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा दृढ आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी व पाचगावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियंका संग्राम पाटील यांच्या माध्यमातूनही आज गावात विकासकामे व सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. त्यामुळे पाचगावचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने पुढे जात असून विकासाचा वारसा अखंड सुरू आहे.
“चला… विकासाचा वारसा पुढे नेऊया!”
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाला प्रगत व विकसित बनवण्यासाठी
आपल्या संग्रामला संधी देऊया!

