
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
कोल्हापुर :-लक्ष्मीपुरी येथील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी ८ वा माजी नगरसेवक श्री रमेश पुरेकर व सौ मृदुला पुरेकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.त्यानंतर मंदिर परिसरामध्ये अथर्वशीर्ष पठण करून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी जन्मकाळ सोहळा असंख्य महिलांच्या उपस्थित संपन्न होऊन महाआरती करण्यात आली तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक मा. श्री ऋतुराज क्षीरसागर , नगरसेवक आश्किन सुभेदार , बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक शेटे उपाध्यक्ष श्री अमर क्षिरसागर यांच्या शुभहस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले.अनेक गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव उपाध्यक्ष सागर सन्नकी खाजानिस विजय कागले सचिव बलराज निकम गणेश सन्नकी वैभव सावर्डेकर किशोर तांदळे सुरेश लिबेकर विशाल कोगनुळे यश मकोटे अमित खटावकर वैभव लाड सिद्धार्थ तांदळे राजेश आवटे सचिन मिठारीराहुल हळदे संजय खोत यांच्यासह व्यापारी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



