
कोतोली | प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
कोतोली पंचायत समिती मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष पुरस्कृत (अपक्ष) उमेदवार श्री. आनंदा सदाशिव अंगठेकर यांच्या प्रचाराचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. कोतोली येथील हनुमान देवालयात विधिवत पूजन करून प्रचार समारंभास प्रारंभ करण्यात आला.या प्रचार समारंभाच्या वेळी श्री. ज्ञानेश्वर सुतार (पन्हाळा तालुका सुतार-लोहार उन्नती संस्थेचे पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, जिल्हा कार्यकारणी सदस्य) यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधताना,“पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभारासाठी आनंदा सदाशिव अंगठेकर यांना विजयी करणे काळाची गरज आहे,” असे ठाम आवाहन केले.

या कार्यक्रमास बळवंत ज्ञानदेव टिके (जिल्हा उपाध्यक्ष, किसान मोर्चा, भाजपा) यांच्यासह बाजीराव पाटील (कोतोली), बाळू टिके (वाघुर्डे), आनंदा कांबळे, प्रवीण चव्हाण (कोलोली) तसेच भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उमेदवार श्री. आनंदा सदाशिव अंगठेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,“मतदारांनी मला एक संधी दिली, तर शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणारा, पारदर्शक व विश्वासार्ह कारभार करण्याचा माझा ठाम संकल्प आहे.”प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, कोतोली पंचायत समिती मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

