शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा विभागीय स्तरावर विवेकानंद कॉलेजचे वर्चस्व विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांची उल्लेखनीय कामगिरी

0
19


कोल्हापूर, दि. : पांडुरंग फिरींगे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित विवेकानंद कॉलेज (स्वायत्त), कोल्हापूर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा यांच्या विभागीय फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाला अव्वल स्थान मिळवून दिले.
दि. ३० जानेवारी २०२६ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे ही विभागीय स्पर्धा उत्साहात पार पडली. विविध कला, साहित्य व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विवेकानंद कॉलेजच्या स्पर्धकांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गटात
अनुराधा भास्कर कांबळे – प्रथम क्रमांक (वक्तृत्व)
शुभम संजय दरगडे – प्रथम क्रमांक (चित्रकला)
सुप्रिया कृष्णात कुंभार – द्वितीय क्रमांक (कराओके)
गुरुदेव कार्यकर्ता गटात
श्री. सागर कांबळे – द्वितीय क्रमांक (कराओके)
प्रा. सतीश उपळावीकर – तृतीय क्रमांक (चित्रकला)
प्रियांका कांबळे – तृतीय क्रमांक (वक्तृत्व)
यश संपादन केले.
ज्युनियर कॉलेज (कनिष्ठ महाविद्यालय) गटात
वक्तृत्व स्पर्धा : प्रथम – इंदुरकर श्रेया अमर, द्वितीय – मोरे वेदिका दिलीप
सुगम गायन : प्रथम – साई नारायण गुंडकल्ले
टॅलेंट सर्च : प्रथम – श्रावणी उत्तम सांगळे
चित्रकला : द्वितीय – सायमा आसिफ गोलंदाज
या स्पर्धेच्या शाखास्तरीय फेरीत निवड झालेल्या विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी विभागीय स्तरावरही आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली.
विवेकानंद सप्ताह स्पर्धेचे शाखा समन्वयक प्रा. अविनाश गायकवाड, डॉ. आर. वाय. पाटील, डॉ. कैलास पाटील, डॉ. अस्मिता तपासे, डॉ. समीक्षा फराकटे, डॉ. संजय अंकुशराव, डॉ. सुमय्या इनामदार, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. सतीश उपळावीकर यांच्यासह अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी सर्व यशस्वी स्पर्धक, समन्वयक व सहभागी शिक्षकांचे अभिनंदन करत ही कामगिरी संस्थेच्या शिक्षण, संस्कार व सर्वांगीण विकासाच्या ध्येयाशी सुसंगत असल्याचे नमूद केले. या स्पर्धेसाठी आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष विभागप्रमुख डॉ. श्रुती जोशी, रजिस्ट्रार श्री. सचिन धनवडे व श्री. सदानंद दुर्गुळे यांचे विशेष सहकार्य लाभले.ही स्पर्धा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय स्तरावर आयोजित केली जाते. विभागीय स्तरावरील हे यश आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या प्रतिनिधींना मजबूत आत्मविश्वास देणारे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here