कोल्हापूर :  राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, महाडिक गटाला मोठा धक्का 

0
67

कोल्हापूर प्रतिनिधी: प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद प्रादेशिक साखर सहसंचालकांनी अपात्र ठरवले. यात शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील १० जणांचा समावेश आहे.

यानिकालामुळे महाडिक गटाच्या अडचणी वाढणार आहेत. तर आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.

या निकालावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे मत व्यक्त करत झालेली निवडणूक बेकायेशीर असून फेर निवडणुकीसाठी आयोगाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

‘राजाराम’ कारखान्याचा सत्तासंघर्ष गेली दहा वर्षे आमदार सतेज पाटील व महादेवराव महाडीक यांच्यात सुरू आहे. कारखान्यांच्या निवडणुकीत मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतर पाटील यांच्या गटाने १८९९ सभासदांवर हरकत घेतली होती.

साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी सभासदत्वाचे पुरावे तपासले असता कागदपत्रात त्रुटी आढळल्याने तब्बल १३४६ सभासद अपात्र ठरले. सहकार मंत्र्यानंतर उच्च न्यायालयाने देखील हा निर्णय कायम ठेवला होता.

सत्ताधाऱ्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायलयाने १३४६ सभासदांचे अपात्रतेचा निर्णय स्थगित करुन या सर्व अपात्र सभासदांची फेरसुनावणी घ्यावी असे आदेश प्रादेशिक सहसंचालक यांना दिले होते.

यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी सभासदांना व्यक्तीगत म्हणणे मांडणेसाठी संधी देवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. यानंतर सर्व कायदेशीर बाबी तपासून 1346 सभासदांपैकी 1272 सभासद अपात्र ठरविले.

यानंतर मार्च, एप्रिल 2023 मध्ये कारखान्याची निवडणूक झाली. यामध्ये विरोधी आघाडीच्या 30 उमेदवारांचे अर्ज छाननीतून अवैध ठरले. अन् कारखान्याच्या निकालात सत्ताधारी महाडीक गटाने आपली सत्ता कायम ठेवली.

अशातच प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र असल्याचा निर्णय दिल्याने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here