कोतोली पंचायत समिती निवडणूक :आण्णासाहेब गायकवाडांचा गावोगावी झंझावाती प्रचार, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
30


कोतोली / (प्रतिनिधी) :पांडुरंग फिरंगे
कोतोली पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी आज कोलोली येथील मतदारांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. घराघरांत जाऊन संवाद साधताना त्यांनी निवडणूक का लढवत आहोत, याची भूमिका स्पष्ट केली. कामाचा दीर्घ अनुभव, घरातील राजकीय संस्कार आणि जनतेशी असलेली नाळ या बळावर आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
गायकवाड म्हणाले की, “समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, विकासाची कामे गतीने पूर्ण व्हावीत आणि शेवटच्या माणसापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.” त्यांच्या या निर्धारपूर्ण भूमिकेला मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.


प्रचारादरम्यान गावातील गल्लीबोळांतून झंझावाती फेरी काढण्यात आली. नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून विकासाविषयी अपेक्षा व्यक्त केल्या. प्रचारात रंगराव पाटील, शिवाजी पाटील, नंदू पाटील, साताप्पा गायकवाड, सर्जेराव गायकवाड यांच्यासह शिंदे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, “लोकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा माझ्यासाठी मोठा विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवत विकासाचा अजेंडा पुढे नेणार आहे.”
कोतोली परिसरात गायकवाडांच्या प्रचाराला दिवसेंदिवस मिळणारा वाढता पाठिंबा निवडणूक वातावरण तापवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here