
कोतोली / उंड्री (प्रतिनिधी) :पांडुरंग फिरंगे
गावागावात परिवर्तनाची चाहूल, कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत विजयाचे स्वप्न आणि जनतेच्या मनात विश्वासाची पेरणी… अशा वातावरणात पंचायत समिती उमेदवार आनंदा आंगटेकर यांनी कोतोली परिसरात जोरदार प्रचार दौरा करत मतदारांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले.
उंड्री, निवडे, घोटवडे, तेलवे, कोलोली, कोतोली व नणंद्रे या गावांमध्ये झालेल्या प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “विकास, विश्वास आणि प्रामाणिकपणा” या त्रिसूत्रीवर आधारित नेतृत्व जनतेला हवे असल्याचे चित्र या प्रचारातून स्पष्ट झाले.
यावेळी बळवंत ज्ञानदेव टिक्के, जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा (पश्चिम) यांनी ठाम शब्दांत सांगितले,
“आनंदा आंगटेकर यांचा विजय निश्चित आहे. हा केवळ उमेदवाराचा नाही, तर शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या आशेचा विजय असेल.”
या प्रचारावेळी शहाजी भोसले (तेलवे), प्रकाश चव्हाण, मारुती चव्हाण, प्रशांत चव्हाण, सुनील चौगुले (कोलोली), बाजीराव पाटील (कोतोली) यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सुशांत सुतार, सुनील सुतार, निलेश सुतार, पांडुरंग सुतार, तानाजी अंगठेकर, सुदेश सुतार, अक्षय सुतार, शहाजी भोसले, राजाराम चव्हाण आदी मान्यवरांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील विश्वास, तरुणांमधील उत्साह आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद पाहता या निवडणुकीत परिवर्तन निश्चित असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
कोतोली परिसरात आज एकच चर्चा आहे —
“आनंदा आंगटेकर यांचा विजय आता अटळ आहे!”

