‘विकास हाच ध्यास’—आण्णासाहेब गायकवाडांचा कोतोली पंचायत समितीतून परिवर्तनाचा संकल्प…

0
17

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरंगे
कोतोली पंचायत समिती मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी तेलवे, नणुंद्रे, कोलोली व शेलारवाडी या गावांमध्ये प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत आशिर्वाद घेत सहकार्याचे भावनिक आवाहन केले. शेतशिवार, वस्ती-वस्ती फिरत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, कोतोली पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून त्यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


“धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करा; मी तुमच्या गावाचा सर्वांगीण विकास करीन,” असे ठाम आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.
दरम्यान, सोनाली आण्णासाहेब गायकवाड यांनी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी त्यांनी महिलांनी आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे भावनिक आवाहन करत महिलांचा विश्वास व पाठिंबा मिळवला.
या प्रचारादरम्यान शिंदे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज झालेल्या प्रचारात सुनील तुरंबेकर शिवाजी पाटील, पांडुरंग जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावागावांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, गायकवाड यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here