
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक संध्या जाधव यांना शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभागा मार्फत नुकतीच पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. त्यांनी ” ए स्टडी ऑन कन्सुमर पर्सेप्शन टुवर्ड्स ग्रीन पर्सनल केअर प्रॉडक्ट्स इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ” या विषयावर सातारा येथील डॉ . उदय लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून आपला शोध प्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर केला होता. जो मान्य करून शिवाजी विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी जाहीर केली.
प्रा.संध्या जाधव यांना डॉ. उदय लोखंडे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. वीणा हुंबे, संभाजीनगर यांचे मार्गदर्शन लाभले. चेअरमन मा. ॲड के ए कापसे, व्हाइस चेअरमन अँड अभिजीत कापसे, सचिव मा. मोहन गरगटे, सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ अद्वैत जोशी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

