कोतोली गणात आनंदा अंगठेकर यांना उत्स्फूर्त जनसमर्थन; ‘कपाट’ चिन्हावर बहुमताने विजयी करण्याचे आवाहन

0
29

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोतोली गणातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार श्री. आनंदा अंगठेकर यांना परिसरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. उंड्री, निवडे, घोटवडे, कोलोली, कोतोली, नणंद्रे, माळवाडी, मानेवाडी आणि बाचरवाडी या गावांमध्ये झालेल्या भेटीगाठी, संवाद मेळावे आणि प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या प्रचार दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी रस्त्यांची दुरवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज, स्वच्छता व्यवस्था, तसेच सुसज्ज आरोग्य केंद्रांची आवश्यकता यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. श्री. अंगठेकर यांनी या सर्व प्रश्नांना प्राधान्याने हाताळून ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला. “सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून, प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, लघुउद्योग व कौशल्य विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रचार उपक्रमांमध्ये बळवंत टिक्के (जिल्हा उपाध्यक्ष, किसान मोर्चा), बाजीराव पाटील (सामाजिक कार्यकर्ते), ज्ञानेश्वर सुतार (तालुकाध्यक्ष, सुतार लोहार उन्नती संस्था), भारतीय जनता पार्टी ओबीसी कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य, शहाजी भोसले, बाजीराव भोसले, सुशांत सुतार (युवा नेता), निलेश सुतार, सुदेश सुतार, पांडुरंग सुतार, अक्षय सुतार, निवृत्ती सुतार, डॉ. सरनोबत, प्रकाश चव्हाण, मारुती चव्हाण, सतीश चव्हाण, शशिकांत पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवटी, मतदारांना आवाहन करताना कार्यकर्त्यांनी “कपाट” या निवडणूक चिन्हावर बहुमोल मताचा एकच शिक्का मारून श्री. आनंदा अंगठेकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. कोतोली गणात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here