कमी मनुष्यबळातही उत्कृष्ट सेवा ; कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात टॉप–3 मध्येडॉ. कैलास गीते यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेत आदर्श कामगिरी

0
16

प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मूल्यांकनात प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतोली यांनी संपूर्ण जिल्ह्यात पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही, अनेक उपकेंद्रांवर कर्मचारी उपलब्ध नसतानाही दुर्गम भागातील नागरिकांना सातत्यपूर्ण व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात कोतोली आरोग्य केंद्र यशस्वी ठरले आहे.या उल्लेखनीय कामगिरीमागे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गीते यांचे कुशल नेतृत्व, नियोजन आणि सेवाभावी दृष्टिकोन मोलाचा ठरला आहे. डॉ. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून डॉ. गीते यांची मनापासून प्रशंसा (व्हाव्हा) होत आहे.आरोग्य केंद्रामार्फत माता–बाल आरोग्य सेवा, लसीकरण, साथीच्या आजारांवर नियंत्रण, नियमित तपासण्या तसेच आपत्कालीन सेवांमध्ये प्रभावी कामगिरी करण्यात आली. याबाबत अधिकृत माहिती कनिष्ठ सहाय्यक शुभांगी जंगम यांनी दिली.जिल्हा पातळीवरील रँकिंगमध्ये कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राने पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक व कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
(डॉ. रेवडेकर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here