विवेकानंद कॉलेज मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

0
12

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
येथील विवेकानंद कॉलेज मध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.


या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांची सखोल नेत्र तपासणी करून मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांतील कोरडेपणा तसेच चष्मा घालवण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक उपचार पद्धती याविषयी वैयक्तिक मार्गदर्शन केले. तसेच डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत श्री. रविंद्र मोहिते, शोभना परब, शुभदीप मोंडल, सुयश निकम आणि सुधीर शिंगे यांनी सविस्तर माहिती दिली.
शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाचा लाभ एकूण २२७ प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी केले. या शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संदीप पाटील, डॉ. राजश्री पाटील, डॉ. बी. टी. दांगट व डॉ. पी. आर. बागडे यांनी केले.
यावेळी डॉ. कविता तिवडे, डॉ. ए. एस. महात, डॉ. एस. आर. कट्टीमनी, डॉ. डी. आर. तुपे, प्रा. एच. व्ही. चामे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. सचिन धनवडे, सहा. ग्रंथपाल श्री. हितेंद्र साळुंखे, श्री. संजय दळवी, श्री. सदानंद दुर्गुळे, श्री. बबन करपे व इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here