
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
सुरेश लोहारकोतोली प्रतिनिधीनेहरू विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या सन २००१/२००२ च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपत शाळेला कलर प्रिंटर भेट देऊन आदर्श निर्माण केला.शाळेची गरज ओळखून दिलेल्या या उपयुक्त भेटवस्तूचा स्वीकार मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश लोहार यांनी कृतज्ञतापूर्वक केला. आपल्या मनोगतात त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, “विद्यार्थी मोठे होऊन विविध क्षेत्रात यशस्वी होत असताना आपल्या मातृसंस्थेची आठवण ठेवतात, हीच खरी शाळेची संपत्ती आहे,” असे सांगितले.देश-विदेशात नोकरी व व्यवसायानिमित्त कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरणात शाळेला भेट दिली. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी लक्ष्मी बोरगे, युवराज पाटील, वसंत शेटे, शिवाजी कुंभार, सुभाष पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात आनंद, आपुलकी आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

