विवेकानंद कॉलेज मध्ये “ऊर्जा संवर्धन काळाची गरज” या विषयावर व्याख्यान संपन्न“ऊर्जा संवर्धन हीच ऊर्जा निर्मिती” – डॉ. सौ. गार्गी बरगाले

0
6

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
येथील Vivekanand Collegeच्या गृहविज्ञान विभागाच्या वतीने “ऊर्जा संवर्धन काळाची गरज” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी Encon Education and Research Foundationच्या सीईओ मा. डॉ. सौ. गार्गी बरगाले या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी बोलताना डॉ. बरगाले यांनी “ऊर्जा संवर्धन हीच ऊर्जा निर्मिती” असे प्रतिपादन केले. त्यांनी ऊर्जेचे विविध स्त्रोत, ऊर्जेचा उपलब्ध साठा, सध्याच्या परिस्थितीत ऊर्जा वापरताना घ्यावयाची काळजी तसेच ऊर्जा बचतीचे विविध पर्याय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच कोणतीही विद्युत उपकरणे खरेदी करताना BEE स्टार लेबल असलेली उपकरणे खरेदी करावीत, त्यामुळे ऊर्जा बचत होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय ऊर्जा क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. उर्मिला खोत होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती सई पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती योगिता पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here