
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार पुनरागमन करत ६८ पैकी २० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. काँग्रेसला १५, भाजपला १३, शिवसेना (शिंदे) गटाला ९, जनसुराज्य पक्षाला ५, शाहू आघाडी (राजेंद्र पाटील यड्रावकर गट) ला ४, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ आणि शिवसेना (ठाकरे) गटाला १ जागा मिळाली आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीने आमदार विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यातही यश खेचून आणले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.
पक्षनिहाय बलाबल
| पक्ष | जागा |
|---|---|
| राष्ट्रवादी काँग्रेस | 20 |
| काँग्रेस | 15 |
| भाजप | 13 |
| शिवसेना (शिंदे) | 9 |
| जनसुराज्य | 5 |
| शाहू आघाडी (यड्रावकर गट) | 4 |
| स्वाभिमानी शेतकरी संघटना | 1 |
| शिवसेना (ठाकरे) | 1 |
तालुकानिहाय विजयी उमेदवार
शाहुवाडी
- शित्तूर तर्फ वारूण – सर्जेराव पाटील
- सरूड – अमर पाटील
- बांबवडे – राजकुंवर गायकवाड
- आंबार्डे – स्नेहल वेल्हाळ
पन्हाळा
- सातवे – डॉ. जयंत पाटील
- कोडोली – अमरसिंह पाटील
- पोर्ले तर्फ ठाणे – भगवानराव पाटील
- यवलूज – पूजा पाटील
- कोतोली – वर्षाराणी अरुण पाटील
- कळे – (माहिती प्रतीक्षेत)
हातकणंगले
- घुणकी – शुभांगी महेश कुंभार
- भादोले – सोनाली सावंत
- कुंभोज – शीतल यादव
- आळते – वर्षा सावर्डेकर
- शिरोली पुलाची – सलीम महात
- रूकडी – अतिष शिंगे
- रूई – राहुल आवळे
- कोरोची – सानिका आवाडे
- कबनूर – कुमार कांबळे
- पट्टणकोडोली – महेश पाटील
- रेंदाळ – शिवाजी जाधव
शिरोळ
- दानोळी – नंदिनी संदीप कांबळे
- उदगांव – अमोल चव्हाण
- आलास – प्रशांत शहापुरे
- नांदणी – प्रचिता कोळी
- यड्राव – अर्चना चौगले
- अब्दूललाट – श्रद्धा गायकवाड
- दत्तवाड – बंडू चौगुले
कागल
- कसबा सांगाव – सुवर्णा कांबळे
- सिद्धनेर्ली – सुयशा घाटगे
- बोरवडे – शोभाताई फराकटे
- म्हाकवे – काकासो सावडकर
- चिखली – शिवानी भोसले
- सेनापती कापशी – शिल्पा खोत
करवीर
- शिये – हामू पाटील
- वडणगे – इंद्रजित पाटील
- उचगांव – नामदेव वाईंगडे
- मुडशिंगी – तानाजी पाटील
- गोकुळ शिरगांव – सूदर्शन खोत
- पाचगांव – संग्राम पाटील
- कळंबे तर्फ ठाणे – वनिता भोगम
- पाडळी खुर्द – राजेंद्र सूर्यवंशी
- शिंगणापूर – रसिका अमर पाटील
- सांगरूळ – रेखा मुगडे
- सडोली खालसा – एकनाथ पाटील
- निगवे खालसा – एकनाथ पाटील
गगनबावडा
- तिसंगी – सोनाली पाटील
- असळज – संभाजी पाटणकर
राधानगरी
- राशिवडे बुद्रुक – सागर धुंदरे
- कसबा तारळे – अरुण जाधव
- कसबा वाळवे – अमृता डोंगळे
- सरवडे – संयोगिता मोरे
- राधानगरी – अभिजित तायशेटे
भुदरगड
- गारगोटी – रेश्मा देसाई
- पिंपळगांव – रोहिणी आबिटकर
- आकुर्डे – अर्चना निकम
- कडगांव – सारिका नांदेकर
आजरा
- उत्तूर – शिरीष देसाई
- पेरणोली – सुधीर देसाई
गडहिंग्लज
- कसबा नूल – अनिरुद्ध रेडेकर
- हलकर्णी – शिवशंकर हत्तरकी
- भडगाव – अमरसिंह चव्हाण
- गिजवणे – शैलजा पाटील
- नेसरी – संग्राम कुपेकर
चंदगड
- आडकूर – राजश्री लक्ष्मण गावडे
- माणंगाव – मानसी कल्लाप्पा भोगण
- कुदनूर – विद्या विलास पाटील
- तुडये – रचना गावडे
मतदान: जिल्ह्यात 74.45% मतदानाची नोंद.
मतमोजणी: हातकणंगले येथे 22 फेऱ्या, इतर तालुक्यांत 10–12 फेऱ्या.

