आडमुठ्या कर्मचाऱ्यांची मनमानी विदर्भात मोबाईल सर्व्हिसेस चा बोजवारा

0
400

प्रतिनिधी : प्रमोद पाटील


यवतमाळ प्रतिनिधी : प्रमोद पाटील
विस्कळीत नेटवर्क सेवेमुळे रिलायन्स जिओचे विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्राहक त्रस्त झाले आहेत . काही समाजकंटक कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसात काम बंद करून कंपनीचे टॉवर बंद पाडले असून फायबर चे देखील नुकसान केले आहे .

जिओ कंपनीने आपल्या टॉवर आणि फायबर च्या देखभाल आणि दुरुस्ती साठी प्रताप टेक्नोक्रॅट या व्हेंडर ची नेमणूक केली असून अनेक कामगार प्रताप मध्ये काम करतात . प्रताप च्या देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या काही टेक्निशियन्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्स्वार्था पोटी आपल्या अवास्तव मागण्या मान्य करून घेण्यासाठी हकनाक जिओ ला वेठीला धरले असून यामध्ये सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी , ऑनलाईन सेवा पुरवणारे याना अतिशय त्रास होत आहे . सदर समाज कंटक कर्मचाऱ्यांनी आपल्या अवास्तव मागण्या मान्य करून घेण्यासाठी असामाजिक तत्वांचा वापर केला असून त्यांनी अनेक ठिकाणी टॉवर बंद केले असून बऱ्याच मोठ्या प्रमाणात कंपनीच्या फायबर ची नासधुस केली आहे

नुकताच टेलिफोन सर्विसेस चा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये झाला असून मोबाईल सेवेला नुकसान पोहोचविणे हा अक्षम्य अपराध मानला गेला आहे . असे असूनही मनमानीपणे आपल्या अवास्तव मागण्यांसाठी काही समाजकंटक कर्मचारी हकनाक सामान्य जनतेला त्रास देत असून अशा अप प्रवृत्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सगळीकडून व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here