
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून वर्षाराणी अरुण पाटील यांचा दणदणीत विजय झाला. निकालानंतर विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना वर्षाराणी पाटील यांनी, “प्रभागातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन कोतोली मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.
नाभिक समाजाचे कार्यकर्ते नामदेव पोवार यांनी वर्षाराणी पाटील यांचा विशेष सत्कार केला.यावेळी पी.एम.पाटीलसह कार्यक्रमास विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

