राष्ट्रीय शिवजयंती जगन्नाथपूरी ओडिशा १९ फेब्रुवारी २०२६असेल‌ यात्रा मार्गनाशिक ते जगन्नाथ पुरी ओडिशा राष्ट्रीय गौरव यात्रा

0
7

प्रतिनिधी : जानवी घोगळे

14 फेबुवारी‌‌ सकाळी 9 वाजता कालिका माता मंदिर येथून कुंभमेळा मंत्री गिरिष महाजन‌, महापौर हिमगौरी आडके, उप‌ महापौर विलास शिंदे, महंत भक्तीचरण दास महाराज, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, आमदार सिमा हिरे, नवनिर्वाचित नगरसेवक
यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर‌ रथ यात्रा मार्गस्थ करण्यासाठी उपलब्ध राहतील.

यानंतर मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, डीजीपी नगर, उपनगर, नाशिकरोड, शिंदे टोलनका, सिन्नर येथे खासदार राजाभाऊ वाजे,‌नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले, सिन्नर‌ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलिस हेमंत भामरे, तहसीलदार देशमुख साहेब आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वागत
येईल.
यानंतर पांगरी, वावी, मार्ग रथ यात्रा समुध्दी महामार्ग ने दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील‌‌क्रांती चौक येथे रथ यात्रेचे स्वागत होईल. .
यानंतर रात्री मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे यात्रेचा पहिला मुक्काम राहिलं. शिवाजी राजे जाधव यांच्या तर्फे भव्य स्वागत होईल.

दुसऱ्या दिवशी 15 फेब्रुवारी सकाळी चहा महाशिवरात्र फराळ करून यात्रा नागपुरच्या दिशेने मार्गस्थ होईल. रात्री मुधोजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत रथ यात्रेचे स्वागत पुजन होऊन‌ रथ यात्रा मुक्कामी राहिलं.

तिसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता उपवास सोडून नागपुर येथुन रथयात्रा छत्तीसगड राज्यांची राजधानी रायपुर येथे सायंकाळी 4 वाजता पोहचेल येथील मुख्यमंत्री विष्णूदेव सायजी, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा अध्यक्ष डॉ रमन सिंहजी, मां मातंगी धाम चे महंत प्रेमासाई महाराज आदींसह येथील मराठी बांधवांना कडून‌ भव्य दिव्य स्वागत होईल.‌ यानंतर यात्रा मुक्कामी राहिलं.

चौथ्या दिवशी 17 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता रायपुर येथून मार्गस्थ होईल. ओडिशा राज्यातील संभलपुर येथे रात्री 6 वाजता मुक्कामी राहिलं.
यानंतर 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता भुवनेश्वर दिशेने मार्गस्थ होईल. दुपारी 4
राजभवन‌ येथे ओडीशाचे (राज्यपाल) मा.डॉ. श्री. कंभमपती हरिबाबु , ओडिशा मुख्यमंत्री मोहन चरणजी मांझी‌‌ यांच्या प्रमुख उपस्थितीत रथयात्रेचे भव्य स्वागत पुजन‌ केले जाईल. यानंतर रथयात्रा पुरीच्या दिशेने मार्गस्थ होऊन‌‌ पुरी येथे मुक्कामी राहिलं.
19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य अशी मिरवणूक गुंडीचा माता मंदिर ते पापडिया मठ पर्यंत काढण्यात येईल. यानंतर अरुण स्तंभ येथे पुजन होऊन‌ परिक्रमा करण्यात येईल . यावेळी येथील साधु महंत मोठ्या संख्येने सहभागी होतील‌.‌यानंतर 56 भोग महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.
यानंतर येथील ऑडिटरियम हॉल येथे 4 वाजता येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, केंद्रीय आयुष्यं राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव, सुदर्शन न्यूजचे संचालक सुरेशजी चव्हाणके, राष्ट्रीय कुंभमेळा प्रवक्ता महंत भक्ती चरणदास महाराज, शिवाजीराजे जाधव , ओडिशा जयंती समितीचे अध्यक्ष 1008 श्रीश्री महामंडलेश्वर महंत रामकृष्णदासजी महाराज आदी मान्यवराच्या उपस्थित कार्यक्रम‌‌ संपन्न होईल. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता यात्रा नाशिकच्या दिशेने मार्गस्थ होईल. रात्री रायपूर छत्तीसगड मातंगी धाम रायपूर येथे मुक्काम राहील.
21 फेब्रुवारी सकाळी नाशिकच्या दिशेने मार्गस्थ दुपारी नागपूर समृद्धी महामार्ग येथे भोजन रात्री नाशिकला पोहचेल.

डॉ विलासभाऊ पांगारकर

राष्ट्रीय अध्यक्ष छावा भारत क्रांती मिशन
मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील
समन्वयक उत्तमराव मांढरे
ॲड.. सागर मांढरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here