
पाचगाव प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तथा माजी लोकनियुक्त सरपंच संग्राम गोपाळराव पाटील यांनी दणदणीत विजय संपादन केला. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या लढतीत पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयाची पताका फडकावली.
गेल्या कार्यकाळात राबविलेली विकासकामे, तसेच लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील व उपसरपंच दिपाली गाडगीळ यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीचा मोठा फायदा या निवडणुकीत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. गोपाळराव पाटील यांनी साधलेली व्यापक जोडणी व मतदारांशी असलेला थेट संवाद यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला.
विजयानंतर पाचगाव येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात संग्राम पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना नूतन जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील म्हणाले, “आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगाव मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन सर्वांगीण विकास साधणार.”
या विजयामुळे पाचगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

