
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली पंचायत समिती मतदारसंघातून आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांचा दणदणीत विजय झाला. निकाल जाहीर होताच कार्यकर्ते, पदाधिकारी व नातेवाईकांनी जल्लोष करत त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
विजयानंतर बोलताना नूतन पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब गायकवाड म्हणाले, “मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत विकासकामांना प्राधान्य देईन. जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहीन.”
यावेळी जनरल मॅनेजर पंडित चौगुले यांनी आपल्या परिवाराच्या वतीने गायकवाड यांचा यथोचित सत्कार केला. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विजयामुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

