
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
कोल्हापूर:प्रचंड गतीने वाढत असलेला सोशल मीडिया भविष्यात केव्हाही ठप्प होऊ शकतो. यामुळे बँकिंग क्षेत्रापासून ते विमान प्रवासापर्यंतचे सर्व ऑनलाइन व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी आतापासूनच आपल्या गरजा मर्यादित ठेवून ‘ग्रामीण केंद्रित’ जीवनपद्धतीचा स्वीकार करावा, असे आवाहन पूजनीय बापू महाराज वांयगणकर यांनी केले आहे.
मुक्त सैनिक वसाहत परिसरातील सद्गुरु रेवन सिद्धनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आयोजित आध्यात्मिक चिंतनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भविष्यातील संकटांबाबत अत्यंत गंभीर ‘भाकणूक’ वर्तवली.पाण्यातून महामारी येईल. पाण्यातून भूकंप होऊन सुनामी येईल.त्यामुळे समुद्र काठच्या लोकांना धोका होईल.
असे बापू महाराजांनी सांगितले. आगामी काळात मानवजातीला कोरोनापेक्षाही भयंकर महामारीला सामोरे जावे लागेल. पाण्यातून होणाऱ्या महामारीमुळे जगाची ३० ते ४० टक्के लोकसंख्या कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी सर्वांना पाणी उकळून पिण्याचे व आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा मोलाचा सल्ला दिला.आवाहन केले.
देशाच्या आर्थिक भविष्याबद्दल भाष्य करताना ते म्हणाले की, “भविष्यात सोन्याचे दर पाच लाख रुपये, तर चांदी सहा लाख रुपयांपर्यंत पोहोचतील. इतकेच नाही तर पितळेलाही मोठे मोल येईल.”सन २०२७ मध्ये भारत-पाक युद्ध आणि ‘ ऑपरेशन सिंदूर ३-४ वेळा यशस्वीरित्या पूर्ण करेल, मात्र या युद्धामुळे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
शेती आणि सत्संगाचा मार्ग
या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी भारतीय विचार परंपराच तारून नेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल. शेतकरी राजा होईल.शेवटी सर्वांनी सात्विक विचारांचा अवलंब करून, कमीत कमी गरजांमध्ये विवेकी जीवन जगणे ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले.
प्रताप कुंभार नगर येथील सद्गुगुरु रेवण सिद्धनाथ मंदिराच्या माध्यमातून सकारात्मक जीवनपद्धती आणि ‘सोशल मीडिया विरहित’ मुक्त संवादाचे उपक्रम राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.”मानव जातीच्या कल्याणाचा विचार करणारी भारतीय परंपराच भारताला ‘जगद्गुरु’ बनवेल,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


