‘ईडी’ कारवाईतून स्वत:सह बँकेलाही वाचविल्याबद्दल अभिनंदन, किसन कुराडे यांचा हसन मुश्रीफांना टोला

0
98

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या मागील सभेत कारवाईबद्दल ‘ईडी’च्या निषेधाचा ठराव आपण मांडला. पण, वर्षभरात स्वत:सह बँकेलाही वाचविले, याबद्दल ‘ शहाणे आणि वेड्यांचे ‘ अभिनंदनाचा ठराव मांडतो, असा टोला सभेतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. किसन कुराडे यांनी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना लगावला.

प्रा. कुराडे बोलण्यास उभे राहिल्यानंतर दीड तास घेऊ नका सर, तुमचे वय ८१ झाले, आपला सहस्रचंद्र सोहळा साजरा करुया, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी डिवचल्यानंतर, तुम्ही ८१ वर्षांचा उल्लेख केला म्हणजे बँकेची पुढची सभा बघतो की नाही, याची भीती वाटते, असे कुराडे म्हणाले.

बँक साखर उद्योगाकडे सख्या तर वस्त्रोद्योगाकडे सावत्र भाऊ म्हणून पाहते, असा आरोप त्यांनी केला. यावर, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमतो, तुम्हाला बोलावतो, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. ‘ वर जाण्या अगोदर बोलवा ‘ असा टोला कुराडे यांनी लगावला.

बँकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलांना घ्या, अशी मागणी संस्था प्रतिनिधींनी केली.

यावर, विधानसभेनंतर भरती करणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. बँकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांना बोलावणार आहे, हे आमदार सतेज पाटील यांनी सुचविल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.


तारण साखर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

बँकेच्या तारण साखरेची कारखाना व्यवस्थापन परस्पर विक्री कसे करते ? बँकेच्या प्रतिनिधींच्या समोर ५४० क्विंटल साखर विक्री केली जाते, मग बँक काय करते ? कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करा, अशी मागणी जनार्दन पाटील (परिते) यांनी केला.

तारण साखर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

बँकेच्या तारण साखरेची कारखाना व्यवस्थापन परस्पर विक्री कसे करते ? बँकेच्या प्रतिनिधींच्या समोर ५४० क्विंटल साखर विक्री केली जाते, मग बँक काय करते ? कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करा, अशी मागणी जनार्दन पाटील (परिते) यांनी केला.

संचालकांची मक्तेदारी मोडून काढू

जिल्हा बँकेत काही संचालकांकडून विकास संस्थांची अडवणूक होते. त्यासाठी उपोषणाला बसावे लागते, ही मक्तेदारी मोडून काढू, असा इशारा प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.

प्रोसेडिंग वाचन आसुर्लेकर समर्थकांनी रोखले

मागील प्रोसेडिंग वाचन संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या समर्थकांनी रोखले. ‘पणन प्रक्रिया’ गटाची फोड करण्याबाबतचा ठरावच झाला नसताना तो मंजूर कसा करता ? अशी विचारणा तुकाराम पाटील, निवास ढोले, दाजी पाटील आदींनी केली.

याला सहकार विभागाने मंजुरी दिली असून, हा विषय न्यायालयात आहे, त्यामुळे नामंजूर करता येणार नसल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. साखर कारखाने, सूतगिरण्या, तालुका व जिल्हा पातळीवरील खरेदी-विक्री संघ अशा ७८ संस्थांसाठी दोन जागा आणि उर्वरित ५८५ संस्थांसाठी एक जागा करण्याचा निर्णय सत्तारुढ गटाने घेतला आहे, त्याला बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा आक्षेप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here