आज यशवंत ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना भेटून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे यशवंत ब्रिगेड संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये धनगर ST आरक्षणाचा जीआर राज्य सरकारने लवकरात लवकर काढावा.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या शिक्षक भरती मध्ये धनगर समाजाला NTC प्रवर्गातून ३.५% आरक्षणा नुसार मागील अनुशेष भरून काढून नवीन जाहिरात काढण्यात यावी.
अन्यथा आम्ही यशवंत ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून होणारे शिक्षक भरती वरती बहिष्कार टाकु. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण होईल त्याला शासन जबाबदार असेल.
अशी मागणी यशवंत ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली.
तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका गावात घडलेल्या महिला अत्याचारा विरोधातही यशवंत ब्रिगेड संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
तसेच या प्रकाराचा लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी यशवंत ब्रिगेड च्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कोळेकर सर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे , प्रकाश गोरड, विजय शिंदे, मल्हार येडगे, योगेश देवकुळे, नामदेव लांबोर, स्वप्निल पुजारी, प्रथमेश हराळे, मेघा गावडे, स्वाती वाघमोडे, संगीता शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.