३६ वर्षांच्या समर्पित सेवेला भावपूर्ण सलाम; सौ. आशा प्रसाद जोशी यांच्या स्नेहसंमेलनास मान्यवरांची उपस्थिती

0
22

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

आरोग्य सेवेच्या पवित्र क्षेत्रात तब्बल ३६ वर्षे निष्ठेने, ममत्वाने आणि अपार समर्पणाने कार्य करणाऱ्या सौ. आशा प्रसाद जोशी (आशा चव्हाण सिस्टर) यांनी दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवेला मानाचा मुजरा देण्यासाठी आयोजित स्नेहसंमेलन भावनांनी ओथंबलेला ठरणार आहे.
रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून तीच आपली साधना आहे, या भावनेने कार्य करणाऱ्या सौ. जोशी यांनी हजारो रुग्णांना मायेचा स्पर्श दिला. कठीण प्रसंगात धीर देणारा शब्द, वेळप्रसंगी दिलासा देणारा हात आणि नेहमीच शिस्तबद्ध कार्यपद्धती — या गुणांमुळे त्यांनी आरोग्य विभागात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला, तर अनेकांना नवजीवनाची आशा मिळाली.त्यांच्या या कर्तृत्वपूर्ण प्रवासाचा गौरव करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी हॉल, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी, कोल्हापूर येथे स्नेहभोजन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा केवळ निवृत्तीचा कार्यक्रम नसून एका समर्पित आयुष्याचा सन्मान सोहळा ठरणार आहे.


या प्रसंगी श्री एम. आर. पाटील साहेब, श्री एम. एम. पाटील दादा, श्री एम. एम. भाट, श्रीमती संगीता गुरव, श्रीमती दमयंती मोराळे, श्रीमती रुपालीताई डोंगरे, श्रीमती रसिका लाड, श्री अमर पाटील, श्री संदीप पाटील, श्री विकास लव्हटे, श्री बी. जी. साठे, श्री राहुल शेळके, श्री आसिफ पठाण, श्री शिवाजी काळे, श्री के. आर. पाटील, श्री मोहन जांभळे, श्री अभिजित शिंदे, श्री गणेश पाटील व श्री संजय पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार व आप्तेष्टांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यतत्परतेची, संवेदनशीलतेची आणि माणुसकीची नेहमीच प्रशंसा केली आहे. “आशा सिस्टर म्हणजे रुग्णांसाठी आशेचा किरण,” अशा भावना अनेकांच्या मनात आहेत.त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांच्या सेवाभावाची आणि कार्यशैलीची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.सौ. आशा प्रसाद जोशी यांच्या पुढील आयुष्यास आरोग्य, आनंद, समाधान आणि कुटुंबासमवेत सुखाचे क्षण लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.हा स्नेहसोहळा म्हणजे एका समर्पित प्रवासाला दिलेला भावपूर्ण सलाम ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here