कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (‘गोकुळ’) कडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन३९६ वी शिवजयंती उत्साहात साजरी

0
15

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, प्रकाश पाटील, संभाजी पाटील व अन्य मान्यवर.


कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (‘गोकुळ’) यांच्या वतीने ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शौर्य, संघटन कौशल्य आणि लोककल्याणाचा आदर्श” – नविद मुश्रीफ
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “भारताच्या इतिहासातील शौर्य, धैर्य आणि संघटन कौशल्याचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी न्याय, सत्य आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. त्यांची युद्धनीती, दूरदृष्टी आणि सक्षम प्रशासन पद्धती आजही प्रेरणादायी आहे. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी असलेली त्यांची बांधिलकी आम्हाला कार्यासाठी नवी ऊर्जा देते.”
कार्यक्रमात ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व संचालक अजित नरके यांनीही मनोगत व्यक्त करत शिवरायांच्या कार्याचा गौरव केला. स्वागत व प्रास्ताविक महिला विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर यांनी केले, तर आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी मानले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. दयावर्धन कामत, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. विजय मगरे, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे, गीता मोरे, संभाजी जाधव तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here