कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ अपघात, तरुण जागीच ठार

0
65

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ आज, शनिवारी सायंकाळी एक कार, रिक्षा आणि दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर नऊ जण गंभीर झाले.

पंकज भाऊसाहेब जाधव (वय 20, राहणार दरेवाडी तालुका पन्हाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर नऊ जखमी पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here