कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
समाजातील गरजू घटकांपर्यंत योग्य ती मदत रोटरी मार्फत क्षणाक्षणाला मिळत असते.
आता सुद्धा बचत गटांना रोजगाराची ही नवी संधी मिळावी आणि महिला आत्मनिर्भर होवून सक्षम व्हाव्या या उद्देशातून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल चे प्रेसिडेंट सत्यजित पाटील यांनी हे गोधडी प्रशिक्षण ची कार्यशाळा घेण्याचे ठरवले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने खास बचत गटातील महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण चे नियोजन 10 तारखेला रोटरी हॉल मध्ये पार पडले.
गोधडी हा आपला पारंपरिक वस्त्र वारसा.पणं याला आधुनिकतेची जोड देत अनेक प्रकार कशा पद्धतीने करायचे आणि त्यातून रोजगार निर्मिती कशी होते. याचे मार्केटिंग कस करायच.
याच पूर्ण मार्गदर्शन मला करण्याची संधी मिळाली.
या प्रशिक्षणाचे नियोजन हे रोटरी क्लब चे प्रेसिडेंट सत्यजित पाटील यांनी केले.
यावेळी बचत गटाच्या 80 महिलांनी सहभाग नोंदवला.या प्रशिक्षणातून महिलांनी बनवलेल्या गोधडी डिझाईन मधून 5 गोधडी Queen निवडल्या . या गोधडी Queen ना असिस्टंट गवर्नर रोटेरियन राजे रघूवीर सिंग भोसले आणि रोटेरियन सईराजे भोसले क्लब सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ नागपूर साउथ ईस्ट या प्रमुख पाहुण्यांच्या हस्त्ये बक्षिस देण्यात आले .
या प्रशिक्षणाला रोटरी क्लब ऑफ सेंट्रल चे पदाधिकारी
आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज च्या प्रेसिडेंट मनिषा जाधव,
प्रिया मेंच,वसुधा लिंग्रस,शर्मिला खोत,दिव्या घाटगे,अमृता नाटेकर,गीतांजली ठोमके, आर्या शिंदे,श्रावणी देवमोरे. हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.