कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : आजची अचानक बदलणारी पर्यावरणाची स्तिथी हि भविष्यासाठी धोकादायक आहे, मानवाने वेळीच आपले धोरण बदलले नाही तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल त्यामुळे बदलत्या काळात पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी एन.सी.सी.छात्रानी घ्यावी असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही.एन शिंदे यांनी केले.
ते १ महाराष्ट्र बँटरी एन.सी.सी. युनिट च्या वतीने आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. एन.सी.सी.छात्रानी समाजामध्ये जाऊन वृक्षारोपण,पाणी बचत,वीज बचत,प्लास्टिक मुक्ती अश्या विषयावर जाणीव -जागृती निर्माण करावी असे हि त्यांनी सांगितले.
३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एन.सी.सी.भवन या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.ड्रिल,हत्यार प्रशिक्षण,नकाशा वाचन,फायरिंग याचे हि प्रशिक्षण छात्राना देण्यात आले.मराठा इतिहास आणि संस्कृती ,आरोग्य व प्रथमोपचार या विषयावर डॉ अवनीश पाटील ,डॉ विनिता रानडे , राजेश महाराज यांची व्याखाने आयोजित करण्यात आली.
व्हाईट आर्मी व अग्निशामक दल कोल्हापूर महानगरपालिका याच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व फायर फायटिंग ची प्रात्येकक्षिके दाखवण्यात आली.
भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने या शिबिराची सांगता झाली.या शिबिराचे आयोजन लेफ्टनंट कर्नल एम.मुथनां यांनी ब्रिगेडीअर अभिजित वाळिंबे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
कॅप्टन उमेश वांगदरे,सुभेदार मेजर महेश जाधव, एस/ओ अरुण हाके ,टी ओ संदीप वर्णे,अमर काटकर ,संदीप पाटील ,प्रीती मुरगुडे,डी के राव, भवानी सिंग,राजगोपाल,हवालदार राजाराम, सरोज,रामण्णा यांनी हा शिबिराचे कार्यान्वयन केले.कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील एकूण ५३० एन.सी.सी. छात्रानी यशस्वी पणे हे शिबीर पूर्ण केले.