प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा.
कौशल्य रोजगार उद्योजगता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या ४१८ (आयटीआय)अभ्यासिका वर्गांचे व्हिडीओ कॉन्फरन्सीग द्वारे -उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थान येथून झाले.
यावेळी विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ.रामास्वामी एन., व्यवसाय व प्रशिक्षण संचालनलयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावीत यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे -उपस्थित होते.
या अभ्यासिकांमुळे उमेदवारांचा प्रशिक्षण दर्जा उंचावेल. त्यांना योग्य वेळी अचूक मार्गदशन मिळाल्यास राज्य, देशाचा विकास होण्यास मदत होईल. कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाच्या रोजगार मेळाव्यांनी आतापर्यंत ३ लाख जणांना रोजगार दिला आहे.
आयटीआयच्या अभ्यासक्रमांची संख्या वाढवून ९०० केली आहे. नव्याने सुरू झालेल्या ७५ आभासी क्लासरूम आणि आज (१२ सप्टेंबर) सुरू झालेले अभ्यासिका वर्ग यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील अशी आशा आहे.
महाराष्ट्र पहिल राज्य आहे ज्याने इकॉनॉमिक ॲडवायजरी कौन्सिल स्थापन केली आहे. त्यातून राज्याचे उत्पादन वाढवणे, नवीन सोर्स तयार करणे ही उद्दीष्टे आहेत. डाओसमधील एमओयू झालेल्या १ लाख ३७ कोटींच्या प्रकल्पांची ७० ते ८० टक्के अंमलबजावणी सुरु झाली आहे.
यामुळे महाराष्ट्राकडे लोक आशेने येतात. जी ट्वेंटीमुळे आपली महासत्तेकडे वाटचाल सुरु झाली आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी ८:३० वाजेपर्यंत अभ्यासिका वर्ग सुरू केल्या आहेत. १० वी १२ वी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनाही याचा लाभ घेता येईल.
मुला – मुलींकरीता सर्व सुविधायुक्त स्वतंत्र खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली.