मराठ्यांना आरक्षण मिळणार? जरांगेंचं उपोषण एका महिन्यासाठी मागे

0
144

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे.मराठवाड्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

जरांगे यांच्या मागणीवर विचार आणि चर्चा करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे.

मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकवण्यासाठी अभ्यासाची करण्याची गरज आहे, असं सरकारने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण एका महिन्यासाठी मागे घेतलं आहे.

उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. एक महिन्यानंतर मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.

यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आपण सर्व एकत्र आल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र आरक्षण पत्र सर्वसामान्य मराठ्यांच्या हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.मी अत्यंत पारदर्शकपणे काम करतो.

त्यामुळे मी तुमच्यापुढे अजिबात जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here