घमंडिया आघाडीतील पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी स्टॅलिनच्या हिंदू धर्मविरोधी वक्तव्याची आपली भूमिका स्पष्ट करा – भारतीय जनता युवा मोर्चा.

0
80

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन व ए.राजा याच्या वक्तव्याचा निषेध करत घमंडिया आघाडीतील पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी स्टॅलिनच्या वक्तव्याचा आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे नूतन जिल्हाध्यक्ष गिरीश गजानन साळोखे यांनी कोल्हापुरातील घमंडी आघाडीतील पक्षाच्या प्रमुखांना जाहीर आवाहन केले की स्टॅलिन याच्या वक्तव्याला तुम्ही जर सहमत असाल तर तुम्ही हिंदू नाही म्हणून घोषित करा अन्यथा आघाडीतून डी.एम.के.ला बाहेर काढा आणि देशातील समस्त हिंदूची माफी उदयनिधी स्टॅलिन ने मागावी.


यावेळी उपस्थित माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडेपाटील , दिग्विजय कालेकर,सरचिटणीस विवेक वोरा,सुमित पारखे,सुनील पाटील, वल्लभ देसाई, अमेय भालकर,रोहित कारंडे,गौरव सातपुते, हर्षांक हरळीकर,कार्तिक देशपांडे,विश्वजित पवार, पारस पलिचा,गोविंद पांडीया,बालाजी चौगुले,निरंजन घाडगे,स्वप्नील घुंटे ,विवेक राजवर्धन , पाटोळे,ओंकार गोसावी,प्रथमेश चव्हाण. यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गिरीश साळोखे जिल्हाध्यक्ष
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर महानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here