कोल्हापुरातील नाभिक समाजाच्यावतीनं श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमाच आयोजन

0
58

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : आज रंकाळावेश बस स्थानक इथल्या सेना महाराज वसतिगृहापासून भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहराच्या मुख्य मार्गावरून ही मिरवणूक संपन्न झाली.

 कोल्हापूर जिल्हा नाभिक समाज आणि विविध संस्थांच्यावतीनं यंदा श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

११ सप्टेंबर रोजी सकाळी माजी नगरसेवक ईश्‍वर परमार, बाबासाहेब काशिद, अध्यक्ष नारायण पोवार, प्रभा टिपुगडे, राजाराम शिंदे, मनोहर झेंडे, मोहन चव्हाण, भारत माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शनी आणि मारूतीच्या मूर्तीचं पूजन आणि आरती संपन्न झाली.

यानंतर पालखी पूजन करण्यात आलं. संत सेना महाराज यांची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली.

सजवलेल्या बैलगाडीमध्ये छत्रपती शिवराय, संभाजीराजे, ताराराणी, छत्रपती शाहू महाराज, संत सेनामहाराज, नरवीर शिवा काशिद या महापुरूषांची प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले.

यानंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. धनगरी ढोल-ताशा, वारकरी दिंडीचा या मिरवणुकीत समावेश होता. शहराच्या मुख्य मार्गावरून दुपारी ही मिरवणूक संपन्न झाली.

त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी अविनाश यादव, दीपक खराडे, दीपक माने, प्रमोद झेंडे, संग्राम काशिद, सुरेश फडतारे, सयाजी झुंजार, मोहन साळोखे, उदय माने, सतिश चव्हाण यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here