कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार यांचे सह काँग्रेसचे महापालिकेचे माजी पदाधिकारी माजी नगरसेवक यांचे बरोबर गणपती विसर्जनानंतर बैठक घेऊन या प्रश्न आढावा घेण्याचे आश्वासन माननीय प्रशासक महोदया यांनी दिले .
या शिष्टमंडळाने महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कमी केलेले दिवस व 60 वर्षावरील कर्मचाऱ्यांचे केलेले काम बंद या अनुषंगाने प्रशासक महोदय यांच्याशी चर्चा केली .
यावेळी प्रशासक महोदयांनी सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना 26 दिवस काम देणेबाबत आदेश देत असल्याबाबत आणि साठ वर्षावरील कर्मचाऱ्यांना काम देणे कायदेशीर अडचण असले बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे अन्य सर्व प्रश्नावर विभाग प्रमुख यांच्याकडून माहिती घेऊन गणेश विसर्जनानंतर आमदारांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगदर देशमुख, ईश्वर परमार, माजी महापौर सौ स्वाती येवलुजे सौ माधुरी लाड, दीपा मगदूम, शोभा कवाळे, मधुकर रामाने भूपाल शेटे, अशोक जाधव लाला भोसले प्रताप जाधव व इतर उपस्थित होते